कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी पवार तर उपसभापतीपदी लडकत यांची बिनविरोध निवड

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी पवार तर उपसभापतीपदी लडकत यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी – आज मंगळवार दि.16/05/2023 रोजी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुनिल वसंतराव पवार यांची तर उपसभापती पदी निलेश भगवान लडकत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या अगोदर विरोधी पक्षनेते व मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार यांचे सूचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदी सुनिल वसंतराव पवार, रा.माळेगाव खुर्द यांची तर उपसभापती पदी निलेश भगवान लडकत, रा.शेरेवाडी-बाबूर्डी यांची नावे जाहीर केली.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टंकसाळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यध्यक्ष धनवान वदक,दूध संघाचे चेअरमन संदिप जगताप, बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय आवळे,लक्ष्मण मोरे, नारायणराव कोळेकर, तुषार कोकरे, सुनिल बनसोडे, दिलीप परकाळे, विलास कदम, संभाजी किर्वे, सूर्यकांत गादीया व सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )