ओबीसी भटक्या विमुक्तांचा आरक्षण एल्गार महामेळावा ९ तारखेला इंदापूर येथे होणार

ओबीसी भटक्या विमुक्तांचा आरक्षण एल्गार महामेळावा ९ तारखेला इंदापूर येथे होणार

प्रतिनिधी – ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी “चलो इंदापूर” चा नारा देत तमाम बारामती तालुक्यातील ओबीसी भटके विमुक्त समाज बांधव हजारोंच्या संख्येने इंदापूर कडे ९ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कुच करणार आहेत. गेल्या सहा दिवसात यासाठी बारामती तालुक्याच्या गावागावात बैठका झाल्या आहेत. शेकडो गाड्यांचे ताफे इंदापूर कडे प्रयाण करणार आहेत. अनेक युवक व कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने मिळेल त्या वाहनाने इंदापूरकडे कूच करणार आहेत अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून “बारामती तालुका ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचावो कृती समिती” च्या वतीने देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला अनिल लडकत, बापुराव सोलनकर, निलेश टिळेकर,नाना मदने, ॲड.संजय नाळे, गणेश काशीद, प्रियदर्शनी कोकरे, लक्ष्मण घोळवे, प्रदीप लोणकर, शरद होले, सुजाता पिंगळे,इत्यादी उपस्थित होते. आदी मान्यवर उपस्थित होते. ओबीसी चे जेष्ठ नेते मा. मंत्री छगन भुजबळ साहेबांना वारंवार टार्गेट करणे, ओबीसीच्या आरक्षणाचे लचके तोडण्याचे प्रयत्न करणे, ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यांवर हल्ले करण्याच्या धमक्या देणे, राजकारणात ओबीसीचे जाणीवपूर्वक खच्चीकरण करणे, ओबीसीच्या जातींना दाखले मिळण्यासाठी होणारे अडथळे, भटक्या विमुक्तांच्या समस्या, अलुतेदार बलुतेदार समाज घटकांना दडपणाखाली राहावं लागण अशा विविध प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या या एल्गार महामेळाव्याला महाराष्ट्रातील ओबीसी चे नेते छगन भुजबळ प्रकाश अण्णा शेंडगे, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, टी पी मुंडे, गोपीचंद पडळकर लक्ष्मण गायकवाड, इत्यादी नेते उपस्थित राहणार असून त्यांची धडाडती तोफ प्रस्थापितांना खिंडार पाडणार यात शंका नाही .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (1 )