कृषि संजीवनी कार्यक्रमाअंतर्गत माळेगाव मधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषि संजीवनी कार्यक्रमाअंतर्गत माळेगाव मधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह मोहिम 2022 – 23 अंतर्गत दिनांक. 29 जून 2022 रोजी मौजे. माळेगाव खुर्द,तालुका बारामती येथे पार पडला. या मोहिमेअंतर्गत प्रगतशील शेतकरी संवाद दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कृषिभूषण पुरस्कृत शेतकरी अशोक पाटील तावरे. यांनी जमिनीचा सेंद्रिय गर्भ व ऊस पाचट व्यवस्थापन अणि हुमणी नियंत्रण प्रकाश सापळे या विषयी मार्गदर्शन केले. तसेच एकरी 90 टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी श्री संतोष तावरे यांनी बेणे निवड आणि एकरी 100 टन ऊस उत्पादन मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहाय्यक कोमल भानवसे यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, PMFME तसेच MAHADBT अंतर्गत राबवण्यात येणार्‍या कृषी योजना व BBF पेरणी तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी विभाग अंतर्गत भाजीपाला पीक प्रात्यक्षिक बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी श्री सुनील शिर्के. सरपंच माळेगाव खुर्द व उपसरपंच निशिगंधा जाधव. ग्रामपंचायत सदस्य पोर्णिमा पवार. व माळेगावचे शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )