हृदय रोग

हृदय रोग

भाग -५ आजी बाईचा बटवा या सदरामध्ये आपण आज पाहणार आहोत हृदय रोग यावरती उपाय

१) सफरचंदाचा मोरंबा ५० ग्रॅम, चांदीचा वर्ख लागून सकाळी सेवन करीत राहिल्याने हृदयाची अशक्तता वगैरे व्याधिंवर आराम येतो.

२) अर्ध्या जेवणानंतर अर्धा ग्लास पाण्यात थोडासा आवळ्याचा रस टाकून प्यावा. नंतर बाकी जेवण करावे २१ दिवस लागोपाठ हा उपाय केल्याने हृदयाचा अशक्तपणा दूर होतो.

३) कच्या बटाटयाच्या रसाने हृदयात होणारी जळजळ थांबते. खडी साखरे बरोबर पिकलेल्या चिंचेचा रस प्यायल्याने पण जळजळ वर्र असा थांबते.

४) ज्यांच्या हृदयाच्या धडकण्याचा वेग सामान्यापेक्षा जास्त आहे, अशा लोकांनी जेवणा सोबत एक कच्या कांदा खाल्यास आराम येतो व हृदयास ताकत मिळते.

५) वाटलेला आवळा गाईच्या दुधा बरोबर प्यायल्याने हृदय रोगांमध्ये आराम येतो.

६) कोरडा आवळा व खडीसाखर सम प्रमाणात घेऊन वाटून घेणे व
एक चमचा चूर्ण रोज पाण्याबरोबर घेतल्याने हृदयरोगात फायदा होतो.

७) १५ ग्रॅम मधात दोन केळी मिसळून खाल्याने आराम येतो. लीची चे फळ उत्तम स्वास्थ्य वर्धक आहे. ते हृदयास शक्ति देते.

माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
( महिला प्रतिनिधी)

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )