स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती दि. १५:- भारतीय स्वातंत्र्याचा ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियत्रंण कार्यक्रमांतर्गत तंबाखू मुक्तीबाबत जनजागृतीपर शपथ देण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारुन सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर त्यांनी प्रशासकीय भवन परिसरात वृक्षारोपणही केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )