सुपे येथे मतदान जनजागृतीकरीता पदयात्रेचे आयोजन

सुपे येथे मतदान जनजागृतीकरीता पदयात्रेचे आयोजन

बारामती, दि. १५: मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान व मतदार जनजागृतीकरीता सुपे येथे पदायात्रेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी स्वीपच्या प्रमुख तथा समाज कल्याण अधीक्षिका सविता खारतोडे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत मुळे, तलाठी नितीन यादव, ग्रामसेवक महेंद्र बेगारे, सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय शिंदे, सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच अश्विनी सकट आदी उपस्थित होते.

यावेळी युवकांनी घोषणाफलक व भित्तीपत्रिक हातात घेवून मतदान करण्याचे आवाहन केले. सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे नागरिकांना मतदान करण्याबाबत संदेश दिला. तसेच सुपे ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांनी मतदानात सहभागी होण्याची प्रतिज्ञा घेतली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )