श्री दुर्योधन बाप्पू भापकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

श्री दुर्योधन बाप्पू भापकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड ( पुणे) चे उपाध्यक्ष श्री दुर्योधन बापू भापकर यांच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोरया सायकल क्लब च्या १६ युवकांनी मोरगाव (बारामती)-खडकी पुणे-आळंदी तुळापूर सायकल राईड आयोजित केली. तसेच आळंदी या ठिकाणी समाधी स्थळावर अभिषेक करण्यात आला तसेच 50 झाडांचे वृक्षारोपण व (६००) वह्या न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर या शाळेत तुला घेऊन वाटप करण्यात आल्या. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री हनुमंत भापकर शाळेचे मुख्यध्यापक श्री संदिप जगताप तसेच पंचायत समिती माजी सदस्य श्री राहुल भैय्या भापकर, लोणी भापकर चे सरपंच श्री रवींद्र काका भापकर व लोणी भापकर पंचक्रोशीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकिता भापकर यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )