श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रभात फेरीचे आयोजन

<em>श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रभात फेरीचे आयोजन</em>

प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज बारामती येथे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये हर घर तिरंगा या अंतर्गत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या घोषणा देऊन प्रभात फेरी शाळेपासून कदम चौक, सुभाष चौक, भिगवण चौक ,ब्लड बँक ,ख्रिश्चन कॉलनी व पुन्हा शाळा अशा पद्धतीने प्रभात फेरी पूर्ण केली .विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानामध्ये सहभागी झाले होते. मा. मुख्याध्यापक श्री पवार बी एन, शिक्षक प्रतिनिधी तावरे जी आर इतर सर्व शिक्षक बंधू- भगिनी तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभाग प्रमुख सुजित जाधव यांनी केले होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )