‘शेतकरी उत्पादक ते कृषि निर्यातदार’ विषयक प्रशिक्षण कोरोना निर्बंधांमुळे स्थगित

‘शेतकरी उत्पादक ते कृषि निर्यातदार’ विषयक प्रशिक्षण कोरोना निर्बंधांमुळे स्थगित

पुणे, दि.११ :- ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 1 हजार इच्छुक, पात्र शेतकऱ्यांना ‘शेतकरी उत्पादक ते कृषि निर्यातदार’ विषयक प्रशिक्षण कोरोनाच्या निर्बंधांमुळे स्थगित करण्यात आहे.

कोविड संदर्भात शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यावर नियोजित कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार उर्वरित प्रशिक्षणे मराठा चेंम्बर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर येथे घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ०२०२५५३०४३१ या क्रमांकावर संपर्क करावा असे आत्माचे प्रकल्प संचालक यांनी कळवले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )