शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लोककला पथकांद्वारे गावोगावी जागर

<em>शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लोककला पथकांद्वारे गावोगावी जागर</em>

पुणे दि.17: जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्यावतीने व जिल्हा नियोजन समितीच्या सौजन्याने आयोजित लोककलांच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध जन कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी योजना, कन्यादान योजना व रमाई आवास योजना यासह विविध योजनांची लोककलेच्या माध्यमातून माहिती या पथकांनी दिली. कला पथकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कलाछंद कलापथकाच्यावतीने दौंड तालुक्यातील सहजपूर, यवत, भांडगाव, कासुर्डी, खुटबाव, दापोडी, केडगाव, बोरीपार्धी, नानगाव, देलवडी याठिकाणी कार्यक्रम सादर केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )