शरदनगर गणेश तरुण मंडळाचा सामाजिक उपक्रम

रक्तदान शिबिराचे आयोजन करून 53 बाटल्या रक्त संकलित

बारामती, प्रतिनिधी :-बारामती मधील शरदनगर गणेश तरुण मंडळ व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने शरदनगर गणेश मंदिर तांदुळवाडी, बारामती येथे काल दिनांक १८/९/२०२१ रोजी गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शरदनगर गणेश तरुण मंडळाच्या अवाहनाला प्रतिसाद देऊन या शिबिरात 53 लोकांनी आपले
सामाजिक कर्तव्य म्हणून रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कोरोना चे सावट अजूनही काही प्रमाणात आहे, त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून गणेश मंडळाच्या कार्यकर्तेनी रक्तदान शिबिर या सारखे विधायक काम हाती घेऊन ये यशस्वी पणे पार पाडले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )