वाफगाव किल्ला सरकारच्या ताब्यात द्या! शरद पवार यांच्याकडे होळकर स्मारक समितीची मागणी!

बारामती: वाफगाव किल्ला सरकारकडे हस्तांतरित करावा या मागणीसाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांची श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर स्मारक संवर्धन समीतीच्या वतीने गोविंद या निवस्थानी भेट घेतली व निवेदन दिले. मागील आठवड्यामध्ये रयत शिक्षण संस्था व पदाधिकारी यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला होता. या पार्श्वभूमीवर बैठक झाली.

यावेळी शरद पवार यांनी वाफगाव येथील होळकर किल्ला राज्य सरकारकडे देण्यास काही हरकत नाही पण शाळा बांधून द्यावी लागेल अशी शिष्टमंडळाला अट घातली.

या बैठकीस स्मारक संवर्धन समितीचे महासचिव भगवानराव ज-हाड, मुख्य सल्लागार डॉ. अर्चना पाटील, जेष्ठ सल्लागार बापुराव सोलनकर, संपतराव टकले, सहसचिव योगेश धरम, चंद्रकांत वाघमोडे, सचिन भोगे पाटील हे सर्व उपस्थीत होते.

यावेळी मुख्य सल्लगार डॉ अर्चना पाटील म्हणाल्या की
1955 सालापासुन वाफगाव किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. पवार साहेब म्हणतात शाळा बांधुन द्या…
शाळा बांधुन देता येईल पण त्यापुर्वी 1955 पासुन आतापर्यंतचे शासकीय रेडी रेकनरनुसार ६५ वर्षाचे भाडे रयत शिक्षण संस्थेने भरावे. तर यातून मार्ग निघू शकेल , होळकर किल्ला हे यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असल्यामुळे संस्थेने याचा गांभीर्याने विचार करावा असे यावेळी पाटील म्हणाल्या.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )