रोहित बनकर यांच्या माध्यमातून बारामती काँग्रेसला संजीवनी …

रोहित बनकर यांच्या माध्यमातून बारामती काँग्रेसला संजीवनी …

प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यात रोहित बनकर यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असून बारामती मध्ये कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश काल दिनांक 7 रविवार रोजी गुणवडी चौक काँग्रेस कार्यालय मध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर, बारामती शहर अध्यक्ष ऍड अशोक इंगुले ,अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष डॉ विजय भिसे, सुरज भोसले पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती विभाग यांच्या उपस्थितीत बारामती मध्ये ऍड निषाद भीमसिंग दुमरे, सतीश पवार, अजय खोत, सोनू बागवान , राजू खोटे, प्रथमेश पवार, तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. तसेच दिनांक 28 जुलै रोजी नवी मुंबई वाशी काँग्रेस भवन येथे ऍड बिलाल बागवान, ऍड स्वरूप सोनवणे यांचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, भानुदास माळी महाराष्ट्र प्रदेश अधक्ष ओबीसी विभाग, रोहितजी बनकर प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग तसेच मुंबईतील अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थित प्रवेश झाला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )