राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

बारामती: (३ जाने.२०२४) प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
आमचा गाव, आमचा विकास या कार्यक्रमांतर्गत पंधरावा वित्त आयोग संकल्पना आधारित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका, जल सुरक्षारक्षक, पाणीपुरवठा कर्मचारी मुख्याध्यापक, ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पना विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रमुख नऊ थीम आहेत. या तुमच्या अनुषंगाने तीन दिवसांमध्ये संकल्पना आधारित प्रशिक्षण देण्यात येत आहे.
विश्वकर्मा स्कीम अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक,महिला यांना गरजेनुसार ट्रेनिंग देणे, जीपीटीपी आराखडा गाव नकाशा डोळ्यासमोर ठेवून गावचा विकास आराखडा बनवणे. मतदार यादीतून मयत मतदार यांची नावे कमी करणे आदी विषयांवर मार्गदर्शन बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी केले.

गाव समृद्ध करण्यासाठी उपजीविका आणि सामाजिक संरक्षण देणाऱ्या योजनांमध्ये सर्व पात्र लाभार्थी घटकांना सामावून घेणे, वैयक्तिक आणि सामूहिक उद्योजकतेद्वारे आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती करणे, गरीब व दुर्बल लोकांना वर्षभर अनुदानित किंमतीत पुरेसेअन्नधान्य उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांनी शेती विषयक दर्जेदार बियाणे,जैविक खते, नवीन माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या शेत जमिनीची उत्पादकता वाढवणे, मूलभूत सेवा उदा. निवारा पाणी आणि स्वच्छता यांची पुरेशी उपलब्धता करून देणे. महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देऊन गरिबी कमी करणे. यामध्ये ग्रामपंचायतची प्रमुख भूमिका सामाजिक आर्थिक आणि जात तिनिहाय जनगणना आणि मिशन अंत्योदय गाव गरिबी निर्मूलन आराखडा संकलित माहितीनुसार अनेक अंगांनी वंचित राहिलेल्या लोकांची निवड करणे गावातील पात्र व गरजूंना सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ देणे, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड चे प्रभावी वितरण करणे, कौशल्यावर आधारित प्रशिक्षणातून उत्पन्न उद्योजकता विकास आणि रोजगार वाढवणे, जमिनीच्या उत्पादकतेत वाढ करणे. स्वयंसहाय्यता गटांना सहायक ठरतील असे प्रशिक्षण देऊन त्यांना बचत वाढीच्या उपक्रमात सहभागी करून घेत गटांसाठी बँक लिंकेज उपलब्ध करून देणे.
जीपीडीपी निधीचे आणि उपक्रमांचे अभिसरण करण्याचे नियोजन करणे जमिनीच्या उत्पादकतेत वाढ करणे त्यासाठी सिंचन उन्नत सुधारित बीज जैविकते शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्र इत्यादींचा वापर करणे आपला गाव समृद्ध गाव, गरीबी मुक्त गाव यावर मार्गदर्शन गटविकास अधिकारी तथा व्याख्याते ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी कुलकर्णी यांनी केले

हरित व स्वच्छ गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त गाव,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व पारंपारिक ऊर्जा स्रोतांचा शंभर टक्के वापर, वृक्षारोपण व रोपवाटिकेद्वारे हिरवळीची निर्मिती,जळावू लाकडांच्या वापरात कपात वीज घरगुती उपकरणे स्वयंपाक व सिंचनासाठी सर्वांना खात्रीशीर वीज उपलब्ध करून देणे जैवविविधता व परिसंस्थेचे संवर्धन व देखभाल निश्चित करणे या थीमवर मा.गटविकास अधिकारी मारकड यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत विकासकामे यावर मार्गदर्शन सहाय्यक गटविकास अधिकारी,पंचायत समिती बारामती नंदकुमार जरांडे यांनी केले.

आरोग्यदायी गाव यामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी,सांडपाणी,घनकचरा व्यवस्थापन,किशोरवयीन महिला व मुली यामध्ये रक्ताचे संसर्गजन्य आजार,रक्तदाब,शुगर, कर्करोग तसेच आरोग्यासाठी आवश्यक पायाभूत सुविध, माता मृत्यू, बालमृत्यू कमी करणे, लसीकरण आदी विषयांवर बारामती पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी सुनिल जगताप यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल,गटविकास अधिकारी तथा व्याख्याते ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी कुलकर्णी,मा.गटविकास अधिकारी मारकड,सहाय्यक गटविकास अधिकारी,पंचायत समिती बारामती नंदकुमार जरांडे,बारामती पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी सुनिल जगताप तसेच गुणवडी गणातील गुणवडी गावच्या सरपंच प्राची घोडे, पिंपळी सरपंच मंगल केसकर,मळद सरपंच किरण गावडे कण्हेरी सरपंच सुनिता पवार तसेच पावणेवाडी सरपंच भगवान तावरे, पिंपळी गावचे उपसरपंच अश्विनी बनसोडे, गुणवडी गावचे उपसरपंच ऋषिकेश फाळके, कण्हेरी गावचे उपसरपंच संतोष काटे तसेच पिंपळी-काटेवाडी गावचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,गुणवडी गावचे ग्रामविकास अधिकारी हौशीराम पोंदकुले, मळद गावचे ग्रामविकास अधिकारी रामराव चांदगुडे,पावणेवाडी गावचे ग्रामविकास अधिकारी अवंती चव्हाण, माळेगाव खुर्दचे ग्रामविकास अधिकारी आय.आर.इनामदार, बारामती पंचायत समिती बचतगट संसाधन समन्वयक विशाल इंगवले तसेच गावचे क्लार्क भोलानाथ खोमणे,अनिल बनकर,रविंद्र भिसे, संदीप खरात, सचिन यादव, कैलास शिंदे आदी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )