राष्ट्रवादी युवती तर्फे कोरोना योद्ध्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा

राष्ट्रवादी युवती तर्फे कोरोना योद्ध्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा

बारामती ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे अध्यक्ष आ. शरदचंद्रजी पवार साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रणेत्या आ. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या सूचनेनुसार व पुणे जिल्हा युवती अध्यक्ष पुजाताई बुट्टे पाटिल व बारामती शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे अध्यक्ष आरती ताई गव्हाळे (शेंडगे) यांच्या संकल्पनेतुन यंदाचे रक्षाबंधन अनोख्या पध्दतीने साजरे करण्यात आले. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे साहेब व त्यांचे सहकारी, रुग्नवाहिका चालक, बारामती महिला हॉस्पिटल अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे तसेच उपअधीक्षक डॉक्टर भोई व त्यांचे सहकारी डॉक्टर्स, वॉर्ड बॉय, बारामती नगर परिषदेचे आरोग्य विभाग निरीक्षक राजेंद्र सोनवणे व त्यांचे सहकारी मजित पठाण बारामती नगर परिषदेचे व सिल्वर जुबली हॉस्पिटलचे कॉन्ट्रॅक्टर कैलास काकडे व त्यांचे सहकारी यांच्यासाठी आज बारामती महिला हॉस्पिटल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शहर युवती अध्यक्ष आरती ताई गव्हाळे शेंडगे , उपाध्यक्ष प्रियांका घोरपडे, संजना गव्हाळे, प्रिया चौरे, पूजा पारख, कविता गव्हाळे, सुप्रिया शेंडगे, पल्लवी पारख, समीक्षा पारख, सुरक्षा वाघमारे, प्रतिक्षा वाघमारे, गायत्री हरिहर, शुभदा खटके, संध्या सोनवणे, राणी सोनवणे, हाफिजा मल्लिक, रोहिणी आटोळे, यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळामध्ये बारामती शहरात सॅनिटायझर फवारणी, कोरोनाग्रस्त पेशंटवर उपचार करणारे डॉक्टर , वॉर्डबॉय कोरोना मध्ये मृत्यू पावलेल्या लोकांचा अंत्यविधी करणारी टीम , कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत करणारे ॲम्बुलन्स चालक, कोरोना तपासणी करणारे लॅब टेक्नीशियन, कोरोना परस्थितीत चौकाचौकांमध्ये गस्त घालणारे पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी या योद्ध्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )