राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी विक्रांत रेडे पाटील यांची निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी विक्रांत रेडे पाटील यांची निवड

प्रतिनिधी- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी महाळुंगचे श्री विक्रांत रेडे पाटील यांची निवड झाली आहे.
विक्रांत हे महाळूग येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते नेहमी सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात, ते महाळूग येथील यमाई देवी मंदिराच्या परिसरात असणाऱ्या मुक्या प्राण्यांना गेले कित्येक वर्ष झाले माकडाची सेवा करत आहेत.
विक्रांत रेडे पाटिल पत्रकार परिषदेत बोलताना असे म्हणाले की माळशिरस तालुका युवक उपाध्यक्ष पद स्वीकारताना मी कौशल्यपूर्वक काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, येणाऱ्या काळात माळशिरस तालुक्यात जनतेच्या हिताचे कार्य व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विक्रांत रेडे यांनी यावेळी दिली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )