राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला रंगपंचमीचा आनंद.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला रंगपंचमीचा आनंद.

प्रतिनिधी ( दिपाली शहाणे) – आनंदाचे व चैतन्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात असलेल्या धुलीवंदनाच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे येथील तळजाई टेकडीवर पद्यभ्रमण करत असताना नागरिकांच्या समवेत रंगपंचमी खेळण्याचा आनंद घेतला. काल धुलीवंदन म्हणजे धुळवड हा महत्त्वाचा सण समजला जातो, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत उत्साहात हा सण देशभरात साजरा केला जातो. या सणाला आनंदाचे व चैतन्याचे प्रतीक मानले जाते, काल नेहमीप्रमाणे तळजाई टेकडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पदभ्रमंतीसाठी गेले असता तेथे आलेल्या सहकाऱ्यांच्या समवेत धुळवड खेळण्याचा आनंद लुटला. नेहमी आपल्या वेगळेपणाची व माणुसकीचा विशेष बाज असणारे दत्तात्रय भरणे हे सतत लोकांमध्ये जाऊन काम करताना आनंद व्यक्त करताना दिसून येतात. लोकांच्या सोबत जोडली गेलेली नाळ घट्ट असल्याचे यातून दिसून येते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )