योगेश भैय्या जगताप दहीहंडी संघाचा सराव शुभारंभ दणक्यात संपन्न…

योगेश भैय्या जगताप दहीहंडी संघाचा सराव शुभारंभ दणक्यात संपन्न…

प्रतिनिधी – दिनांक 17-8-2023 रोजी योगेश (भैय्या) जगताप दहीहंडी संघाचा सराव शुभारंभ बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष मा.जय पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.

यावेळी नगरसेवक मा.बबलु देशमुख, मा.योगेश (भैय्या) जगताप मा.नगराध्यक्ष बा.न.प संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना याच्या शुभ हस्ते देखील शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास युवक अध्यक्ष मा.अविनाश बादल, शहर कार्याध्यक्ष मा.विशाल जाधव, मा.नगरसेवक मा.कुंदन लालबिगे, बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक शुभम ठोंबरे, आबा आटोळे, अभिनव दहीहंडी संघाचे अध्यक्ष मा.राकेश वाल्मीकी, मा.सचिन साबळे सदस्य महाराष्ट्र प्रदेश भाजप माजी नगरसेवक मा.आप्पा अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते मा. संतोष सातव, मा.गजानन गायकवाड,  मा.गौतम शिंदे, पत्रकार मा.तैन्नुर शेख, मा.योगेश नालंदे, मा.गणेश फाळके, मा.सचिन एम.सातव, अमोल पिसाळ ईत्यादी मान्यवरांसह यस यस यस ग्रुप चे शेकडो कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना विशाल जाधव यांनी बबलू जगताप व सौअनिता ताई जगताप यांनी करत असलेल्या सामाजिक कामाचा आढावा देत कौतुक केले. दरवर्षी शरद पवार साहेब, अजित दादा, सुप्रियाताई यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, तसेच शालेय विद्यार्थ्यांना साहित्यांचे वाटप बबलू जगताप यांच्यामार्फत केले जाते.

शहर अध्यक्ष जय दादा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सध्याच्या काळात कार्यकर्ते टिकवणे खूप मोठी कसरत आहे, कार्यकर्त्यांच्या वाढत्या अपेक्षा कार्यकर्त्यांच्या सर्व अडीअडचणी, अपेक्षा, मदत, करण्यासाठी तत्पर असलेले बबलू जगताप व त्यांचे सर्व सहकारी यामुळेच आज एवढा मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग येथे उपस्थित राहिला आहे. तरुणाचं चांगलं संघटन व सामाजिक काम यामुळे बबलू जगताप यांच्या या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर तरुणांनी गर्दी केली आहे. यावेळी योगेश जगताप यांनी देखील उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )