मोदींची गॅरंटी म्हणजे 24 कॅरेट सोन्याची गॅरंटी, काय म्हणाले राजनाथ सिंह

मोदींची गॅरंटी म्हणजे 24 कॅरेट सोन्याची गॅरंटी, काय म्हणाले राजनाथ सिंह

भाजपने लोकसभा निवडणूक 2024 चा शंखनाद केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासह ज्येष्ठ नेते, पदाधिकारी हजर होते. भाजपचा हा जाहीरनामा देशातीलच नाही तर जगातील सर्व पक्षांसाठी गोल्ड स्टँडर्ड असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला. त्यांनी हा जाहीरनामा कसा अस्तित्वात आला. त्यासाठी काय प्रक्रिया करण्यात आली याची माहिती दिली. काय म्हणाले राजनाथ सिंह?
आम्ही जे बोलतो ते करतो
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या जाहीरनामा प्रसिद्धीवेळी भाजपच्या कार्यशैलीची माहिती दिली. भाजप जे बोलतो ते करतो, असा दावा त्यांनी केला. आता केवळ भाजपच्याच नाही तर भारतातील लोकांना त्यावर विश्वास असल्याचे ते म्हणाले. भाजपचा जाहीरनामा तयार करताना खूप कष्ट घेतल्याचे तसेच मोठे संशोधन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक ठिकाणाहून नागरिकांच्या थेट प्रतिक्रिया, त्यांच्या सूचना, विचार, मत यांना प्राधान्य देण्यात आले. त्याआधारे भाजपने जाहीरनामा तयार केल्याचे ते म्हणाले. मोदींची गॅरंटी ही 24 कॅरेट सोन्यासारखी खरी असल्याचे ते म्हणाले.
भाजपसाठी चार जाती
देशात भाजपसाठी केवळ चार जाती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब या चार जाती असल्याचे ते मानतात. त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आता भाजपच्या जाहिरनाम्यात या चार वर्गावरच लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. थोड्याच वेळात ते स्पष्ट होईल.