मैत्री प्रतिष्ठान तर्फे 1000 कुटुंबाना दिवाळी फराळ वाटप ….

मैत्री प्रतिष्ठान तर्फे 1000 कुटुंबाना दिवाळी फराळ वाटप ….

प्रतिनिधी – मैत्री प्रतिष्ठान बारामती शहर, ट्रस्ट यांच्यावतीने घर घर में दिवाळी हा उपक्रम हाती घेतला होता. यामध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बारामती तालुक्यातील १००० गरजू कुटूंबांना फराळ वाटप केले गेले. सदर कार्यक्रम सोमवार दि.२४/१०/२०२२ रोजी सकाळी ९ः३० वा नगरपरिषद समोर संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थित संभाजी नाना होळकर (बारामती तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी ) संदिप बांदल (मा. सभापति पंचायत समिती बारामती, बाळासाहेब जाधव (मा.उपनगराध्यक्ष बारामती), बबलू देशमुख (नगरसेवक बारामती), दिनेश बबलू जगताप व सर्व ज्येष्ठ नागरिक व सर्व मित्र परिवार आणि मैत्री प्रतिष्ठान चे सर्व सभासद उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )