मुस्लिम फ्रंट च्या तालुका अध्यक्षपदी हसीना डांगे यांची निवड

मुस्लिम फ्रंट च्या तालुका अध्यक्षपदी हसीना डांगे यांची निवड

प्रतिनिधी- रियाज पठाण…

बारामती शहरातील पतंगशहानगर येथील रहिवासी असलेल्या हसीना सलिम डांगे यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या बारामती महिला तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. हसीना डांगे या योद्धा महिला मंच च्या सक्रिय सदस्या असून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असल्याने या कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याची भूमिका पार पाडू तसेच महिला सबलीकरण व महिला शिक्षण यांवर विशेष भर देणार असा विश्वास हसीना डांगे यांनी निवडीनंतर व्यक्त केला आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )