माळेगाव येथे महिला शेतीशाळा संपन्न..

माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) मौजे माळेगाव बुद्रुक येथे क्रॉपसॅप संलग्न शेतकरी शेती शाळा खरीप हंगाम 2021 या अंतर्गत रविवार दिनांक 8/8/2021 रोजी बुरुंगुले वस्ती, शिवनगर माळेगाव येथे सोयाबीन पिकाची महिला शेतीशाळा पार पडली. यामध्ये रासायनिक खतांचा कमी वापर, हुमनी नियंत्रक प्रकाश सापळे, फळबाग लागवड आणि सोयाबीन पिकाच्या खताचे मार्गदर्शन या विषयावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी पर्यवेक्षक गोलांडे साहेब आणि कृषी सहाय्यक भानवसे मॅडम यांनी वरील विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच शितल बुरुंगुले, प्रगतशील शेतकरी अश्विनी बुरुंगुले व परिसरातील महिला शेतकरी उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम घेण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )