‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन

<em>‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन</em>

बारामती दि. २८: महिला रुग्णालय बारामती येथे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत
० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांसाठी “सुदृढ बालक स्पर्धेचे” आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले.

या कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगतज्ञ डॉ. उदय राजपूत, डॉ. संकेत नाळे व
डॉ. सौरभ मुथा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेमध्ये बालकांचे लसीकरण, वाढ व विकासाचे टप्पे, आहार व शारीरिक तपासणी या मुद्द्यानुसार तपासण्या करण्यात आल्या.

प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. यावेळी वसुंधरा वाहिनी बारामती व बहुउद्देशीय पर्यावरण संस्था यांच्यामार्फत पोषक आहार कीट व फळ वाटप करण्यात आले तर महिला रुग्णालयातर्फे सर्व बालकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

यावेळी स्त्रीरोगतज्ञ डॉ. कोरे, वैद्यकीय अधीक्षक न्हावरा डॉ. बापू भोई, बहुउद्देशीय पर्यावरण संस्थेचे डॉ. आटपळकर, देवा तांबे, वसुंधरा वाहिनीच्या आशा मोरे, सहा. अधिसेविका एस्तेर जाधव, बालरुग्णपरिचारिका ममता कांबळे, राजश्री संजवाड, सुनीता पवार, अनिता माळी, नजहत शेख, सारिका साठे, परिसेविका शारदा रुपनवर, राणी सर्जे, शालन गावडे यांच्यासह सर्व परिचारिका वर्ग उपस्थित होता.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )