मनोहर मामा भोसले याला पुन्हा तीन दिवस पोलीस कोठडित वाढ

मनोहर मामा भोसले याला पुन्हा तीन दिवस पोलीस कोठडित वाढ

बारामती : मनोहर मामा भोसले याला बारामती पोलिसांसह पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने साताऱ्यात (satara) पकडले होते . त्यानंतर त्याला याअगोदर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. आज दि १६ रोजी मनोहर मामा भोसले याला पुन्हा न्यायालयात हजार करण्यात आले होते. बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून मनोर मामा सह तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली होती. हा फसवणूकीचा प्रकार मागिल तिन वर्षांपासून सुरू होता.

दरम्यान आणखी दोन आरोपी विशाल वाघमारे (नाथबाबा) व ओंकार शिंदे हे फरार आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )