मधमाशी पालन व जैविक खत निर्मिती आणि वापर” या विषयी दोन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन

मधमाशी पालन व जैविक खत निर्मिती आणि वापर” या विषयी दोन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन

प्रतिनिधी – दि. २५ मे आणि २६ मे २०२३ रोजी विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती आणि गोदागिरी फार्म श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन आणि जैविक खत निर्मिती व वापर या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी अध्यक्ष म्हणून विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. ॲड. अशोक प्रभूणे सर तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. ऋषिकेश औताडे संस्थापक आणि संचालक गोदागिरी फार्म श्रीरामपूर तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ मॅडम हे उपस्थित होत्या.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. श्री. ॲड. अशोक प्रभूणे सर यांनी मधमाशी पालन आणि जैविक खतांचे महत्व विषद केले तसेच ८०% आयुर्वेदिक औषधे मधाबरोबर घेतली जातात त्यामुळे आयुर्वेदात देखील याचे अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या घडीस मधमाशी पालन या क्षेत्रात जास्त स्पर्धा नाही त्यामुळे आपल्या तरुण पिढीसाठी यामध्ये खूप संधी आहे. मधमाशी जर पृथ्वीवरुन नष्ट झाली तर मानव जात फक्त चार वर्षे जगू शकते असे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे म्हणणे होते याचा संदर्भ दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. ऋषिकेश औताडे यांनी रामायणातील संदर्भ देताना “मधुबन” हा शब्द अगदी पुरातन काळापासून आहे याचा दाखला दिला. मधमाशांच्या बी वॅक्स पासून त्यांच्या अर्कापासून मेण तयार केले जाते याबाबत माहिती दिली.
तसेच या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षणार्थीना मधमाशी हाताळणी नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मधाची काढणी, मधमाशी पालनासाठी लागणारे विविध साहित्य, मधमाशी पासून जास्तीत जास्त मधाचे उत्पादन घेण्यासाठी फुलोऱ्याचे व्यवस्थापण, किटक मधमाशांचे सृष्टीतील स्थान, कृत्रिम पेट्यांचे प्रकार, मधमाश्यांचे वैशिष्ट्य, मधमाशांची श्रमविभागणी, वसाहतीचा जीवनक्रम आणि वसाहतीची वाढ व मधमाशी पालनाच्या विविध शासकीय योजना या संदर्भात माहिती दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना बिकीपिंगच्या फ्रेम स्लाईडचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले व जैविक खत निर्मिती कशी केली जाते तसेच सेंद्रिय शेतीचे महत्व या संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी शेतकरीबांधव उद्योजक व विद्यार्थी मिळून ५० जणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त मा. सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष मा. श्री. ॲड. अशोक प्रभूणे, खजिनदार मा. श्री. युगेंद्र पवार, सचिव मा. ॲड. निलीमा गुजर, विश्वस्त मा. डॉ. राजीव शहा, मा. श्री. मंदार सिकची, मा. श्री. किरण गुजर, रजिस्ट्रार कर्नल श्रीश कंबोज यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत शेरखाने यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शैलजा हरगुडे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे आभार प्रा. जिज्ञासा ओक यांनी मानले. तसेच हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )