भिमसेन उबाळे यांना फुले,शाहू,आंबेडकर, अण्णाभाऊ पुरस्कार..

भिमसेन उबाळे यांना फुले,शाहू,आंबेडकर, अण्णाभाऊ पुरस्कार..

पंढरपूर,प्रतिनिधी – पंढरपूर येथे नॅशनल दलित मुमेंट फोर जस्टीसच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त फुले,शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ पुरस्कार एन डी एम जे संघटनेचे राज्य महासचिव एड. मा. केवल उके , राज्य सचिव वैभव गीते, राज्य संघटक पंचशीलाताई कुंभारकर व माळशिरस येथील ज्येष्ठ नेते विकासदादा धाईंजे, तसेच नातेपुते येथील पत्रकार मित्र मार्गदर्शक प्रमोद शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. आजपर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून साप्ताहिक संपादक भीमसेन सर्जेराव उबाळे यांना फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ या राज्यस्तरीय पुरस्कारने पंढरपुर येथे सन्मानित करण्यात आले.
एन डी एम जे यांच्या सामाजिक कार्यास साप्ताहिक रयतेचा भिम प्रहार परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या कार्यात जमेल त्या स्वरूपात हातभार लावण्याचे संपादक भीमसेन उबाळे यांनी यावेळी वचन दिले .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )