भारत मुक्ती मोर्चाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी ॲड.सुशिल अहिवळे

भारत मुक्ती मोर्चाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी ॲड.सुशिल अहिवळे

बारामती/प्रतिनिधी – भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी बारामती येथील ॲड.सुशिल भारत अहिवळे यांची निवड करण्यात आली आहे.तर बारामती तालुका अध्यक्ष पदी सिद्धार्थ रामभाऊ लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशावरून हि निवड केली असून काल दि.१ ऑगस्ट रोजी इंदापूर येथे झालेल्या बैठकीत भारत मुक्ती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा उबाळे यांनी ॲड.अहिवळे आणि लोंढे यांना नियुक्ती पत्र दिले.

येत्या काळात शिव-फुले-शाहू-आंबेडकर व बहुजन महापुरुषांची विचारधारा आणि खरी चळवळ समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचून भारत मुक्ती मोर्चाचे संघटन पुणे जिल्ह्यामध्ये अधिक मजबूत करणार असल्याचे यावेळी निवडी नंतर ॲड.अहिवळे यांनी सांगितले.दरम्यान याआधी ॲड.अहिवळे यांच्याकडे भारत मुक्ती मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )