बारामती नगरपरिषद प्राथमिक शाळांना क्रिडा साहित्य उपलब्ध

बारामती नगरपरिषद प्राथमिक शाळांना क्रिडा साहित्य उपलब्ध

प्रतिनिधी:- बारामती नगरपरिषद प्राथमिक शाळांना क्रिडा साहित्य उपलब्ध करण्यात आले. क्रिडांगण विकास अनुदान २०२०-२०२१ वार्षिक योजने अंतर्गत क्रिडा जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे यांचेकडे मागणी करण्यात आली होती. ९०% मागासवर्गीय विद्यार्थी असणा-या शाळांना ही योजना लागू होती. यामध्ये ५२ प्रकारचे क्रिडा साहित्य उपलब्ध झाले. त्यात प्रामुख्याने मैदानी खेळाचे साहित्य व खोलीतील बैठी खेळाचे साहित्यांचा समावेश आहे. प्रत्येकी शाळेला ३ लाख रु. किंमतीचे साहित्य मिळाले आहे. त्यामध्ये शाळा क्र.१ ते शाळा क्र.८ प्राथमिक शाळेचा समावेश आहे.
शिक्षण समिती बा.न.प मार्फत नगरसेविका मयुरी सुरज शिंदे यांनी क्रिडा साहित्यांची मागणी केली होती, तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे येथे सातत्याने पाठपुरावा केला साहित्य उपलब्ध होण्यासाठी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
शिक्षण समिती सभापती बेबीमरीयम बागवान, नगरसेविका मयुरी सुरज शिंदे व मुख्याध्यापक चव्हाण, ढोले यांनी क्रीडा साहित्यांची पाहणी केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )