बारामती तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना मंजुरी

<em>बारामती तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना मंजुरी</em>

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) बारामती तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार .व खासदार सौ.सुप्रिया सुळे. यांच्या विशेष
प्रयत्नांतुन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडुन रूपये १०३ कोटी रक्कमेच्या योजनांना
प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार. यांचे संकल्पनेतुन या योजनांची आखणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत (MJP) करण्यात आलेली होती.
यामध्ये १२ गावे ५८ वाडया/वस्त्यांचा हा आराखडा बनविण्यात आला होता. या योजनेसाठी
पाटबंधारे विभागाकडील जागा साठवण तलाव, जलशुध्दीकरण केंद्र व उंच जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे. तसेच निरा-डावा कालवा मधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रितसर परवाना दिला आहे. तसेच या सर्व योजनांसाठी साठवण तलाव, मुख्य संतुलन पाणी टाकी,
जलशुध्दीकरण केंद्र, वितरण व्यवस्था, उंच जलकुंभ, पंपहाऊस इ. बाबी बरोबर सदरचे योजनेसाठी सौरउर्जाद्वारे विज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योजना विज देयकावरील ग्रामपंचायतीचा खर्च कमी प्रमाणात येणार आहे. या अगोदर ३३९ कोटी रूपयांच्या ६० गावांच्या ७ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी
मिळालेली असुन उर्वरित ११० कोटी रूपयांच्या प्रादेशिक योजना प्रस्तावित पाणी पुरवठा खात्याकडे जमा केला आहे.
१) माळेगांव खुर्द – पाहुणेवाडी नळपाणी पुरवठा योजना – १७.४० कोटी
२) होळ – सस्तेवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना-२८.२६ कोटी
३) गडदरवाडी – खंडोबाचीवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना- 11.95कोटी
४) पिंपळी – कन्हेरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना- 17.99कोटी
५) करंजेपुल – सोरटेवाडी प्रादेशिक नळपाणीद पुरवठा योजना- २८.०६ कोटी
अशी माहिती योजना समितीचे समन्वयक व बारामती तालुका पुनर्विलोकन व एकात्मिक विकास
समन्वय समितीचे अध्यक्ष श्री.संभाजी होळकर व बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ.निता फरांदे व श्री.तन्मय कांबळे, उपअभियंता प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बारामती उपविभाग यांनी दिली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )