बारामतीत डॉ.आंबेडकर पुतळा स्मारक येथे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी..

बारामतीत डॉ.आंबेडकर पुतळा स्मारक येथे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी..

बारामती/ प्रतिनिधी – येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे स्वराज्य जननी,राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी समितीचे सदस्य शुभम अहिवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर प्रा.रमेश मोरे यांनी मनोगत व्यक्त करून जिजाऊ जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी या कार्यक्रमाला,माजी नगरसेवक गणेश सोनवणे,मराठा सेवा संघाचे विकास खोत,भूषण ढवाण पाटील,एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फैय्याज शेख, वि श्री कांबळे,प्रा.शिल्पा घोडके,विजय खरात,अभिजित चव्हाण,सुरज शिंदे,समितीचे सदस्य गौतम शिंदे,सोमनाथ रणदिवे,चेतन साबळे,गजानन गायकवाड,विश्वास लोंढे,सचिन काकडे,निलेश खरात,कैलास शिंदे,सुशिल भोसले,रितेश गायकवाड,मनोज केंगार,दादा टेकाळे,अक्षय खरात,बाळू पवार आदी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )