बारामतीत अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

बारामतीत अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

बारामती प्रतिनिधी ( गणेश तावरे) – साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती महोत्सव साठे नगर कसबा या ठिकाणी अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व लहुजी प्रतिष्ठान पॉईंट यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सकाळी ११ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर,बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जय पाटील यांच्या हस्ते आण्णा भाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साठे नगर मधील अंगणवाडीतील लहान मुलांना शालेय साहित्य,खेळणी,कपडे,स्कुल बॅग वाटप करण्यात आले.मंडळाच्या विविध उपक्रमांचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी कौतुक केले.

त्याचसोबत संध्याकाळी ६ वाजता माजी उपनगराध्यक्ष श्री विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आण्णाभाऊ साठे तरुण, मंडळ,लहुजी प्रतिष्ठान पॉईंट,जय लहुजी फ्रेंड सर्कल, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, लहुजी शक्ती सेना बारामती, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना बारामती, लहुजी स्वराज्य सेना, स्वाभिमानी लहुजी शक्ती सेना बारामती,सत्य शोधक बहुजन आघाडी, साठे नगर मधील विवीध संघटनां व संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे,बारामती शहर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, दत्तात्रय सातव,मा.नगरसेवक सुरज सातव,माजी शहराध्यक्ष नगरसेवक सुभाष ढोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेस प्रारंभ करण्यात आला.या शोभायात्रे मध्ये महिलांचा विशेष सहभाग होता.याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक पालवे,पाटील माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,काळुराम चौधरी,नवनाथ बल्लाळ,कुंदन लालबिगे,प्रा.रमेश मोरे,साधु बल्लाळ,विशाल जाधव, चंद्रकांत खंडाळे,दिनेश जगताप,शुभम अहिवळे,बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष उमेश काळे, उपाध्यक्ष योगेश गाडेकर,पी.टी.गांधी,अॅड बापु शिलवंत,अॅड अमोल सोनवणे यांच्यासह आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष विजय खरात,ॲड.अमृत नेटके, ॲड.स्वप्निल खरात,अहमद तांबोळी,सागर जाधव,राहुल खरात ,सनी खरात,विजय सकट, विशेष आवळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधु बल्लाळ यांनी केले तर ॲड.स्वप्निल खरात यांनी आभार मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )