प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर संपन्न

प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर संपन्न

बारामती :(प्रतिनिधी :रियाज पठाण.) प्रहार दिव्यांग संघटना बारामती आणि बुधरानी हॉस्पिटल पुणे संचलीत, अंधत्वातून दृष्टीकडे या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी शनिवार दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त, रिमांड होम बारामती येथे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. तरी परिसरातील अपंग दिव्यांग बांधवांनी तसेच जेष्ठ नागरिकांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक जयसिंग देशमुख, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते. तसेच नेत्रचिकित्सक अमन मंडले व नेत्रमित्र अक्षय बोडरे यांनी नेत्र तपासणीचे काम सांभाळले.
प्रहार दिव्यांग संघटना बारामती शहर अध्यक्ष मृत्युंजय सावंत, तालुका महिला अध्यक्ष सौ.शोभा तावरे यांनी संघटनेच्या वतीने प्रमुख पाहुणे आणि नेत्र विभाग व आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )