पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करून बारामती करानी घालून दिला पर्यावरण रक्षणाचा आदर्श

पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करून बारामती करानी घालून दिला पर्यावरण रक्षणाचा आदर्श

प्रतिनिधी – घरगुती गणरायाला गुरुवारी भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बारामतीमधील भक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जन करण्यावर भर दिला. बारामती नगर परिषदेने ३० हुन अधिक जलकुंडाची व्यवस्था केली होती. तेथे भाविकांची दिवसभर गर्दी होती. शहरात सकाळ पासून 4400 हुन अधिक मूर्तींचे जलकुंडामध्ये पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले .बारामती शहरात पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची पद्धत वाढत आहे. यावेळी धो धो कोसळणारा पाऊस होता तरीही बहुतांश नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन करण्यावर भर दिला. घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता बारामती नगरपालिकेची यंत्रणा सज्ज होती. नागरिक – प्रशासन एकत्रित आल्याने गणपती विसर्जनाला यंदाही पर्यावरण पूरक विसर्जन पद्धत रुजल्याचे दिसून आले. वॉर्डनिहाय विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा लाभ घेत प्रत्येक प्रभागातील भाविकांनी स्वयंस्फूर्तपणे एकत्रित जात पर्यावरणपूरक विसर्जनावर भर दिला गेला. नीरा डावा कालव्या वर विसर्जन कुंडांची व्यवस्था होती. तेथेही पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन झाले.
नदी कॅनॉल विहीर तलावांचे प्रदूषण होऊ नये यासाठी बारामती नगर परिषदेचे २०० हुन अधिक अधिकारी कर्मचारी धो धो कोसळणाऱ्या पाऊसात विसर्जन मिरवणूकी मध्ये व जलकुंडा शेजारी उपस्थित होते ३० गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड व संकलित मूर्ती घेवून जाण्यासाठी ४ वाहने निर्माल्य घेऊन जाण्यासाठी २० वाहने व पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली होती आपासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने विविध ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वयंसेवक उपस्तिथ होते जमा झालेल्या निर्माल्य पासून नगरपालीका व प्रतिष्ठान च्या वतीने सेंद्रिय खत निर्मिती सुरू करण्यात आली तसेच प्रंचड प्रमाणात कोसळणारा पाऊस अनेक ठिकाणी पाऊसामुळे पाणी साचले होते त्यामुळे गणेश मंडळांना विसर्जन मिरवणूकित अडथळे निर्माण होत होते अश्या परिस्थितीमध्ये बारामती नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी रस्त्यावरील पाणी मोकळे करून देण्यात मोलाचे योगदान दिले तसेच सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वच्छ्ता कर्मचारी यांनी विसर्जन मिरवणुकी दरम्यान होणारा कचरा तात्काळ गोळा करून बारामती शहर अवघ्या काही तासांत स्वच्छ केले. अग्निशमन विभाग कर्मचारी यांनी कॅनॉल परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोक नियोजन केले दिवसभरात 2 व्यक्तींचे कॅनॉल मध्ये वाहत जात असताना अग्निशमन विभाग कर्मचारी यांनी प्राण वाचवले यामुळे सर्व स्तरातून बारामती नगर परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )