धार्मिक सलोखा अबाधित राहण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा -उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे

धार्मिक सलोखा अबाधित राहण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा -उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे

प्रतिनिधी – समाजातील धार्मिक सलोखा अबाधित राहावा यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा असे मत बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी व्यक्त केले. पवित्र रमजान ईदच्या निमित्त वसंतनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ओंकार जाधव मित्र परिवाराच्या वतीने वसंतनगर बारामती येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

वसंतनगर परिसरात गेली सत्तर वर्षे हिंदू,ख्रिश्चन व मुस्लिम धर्मीय सलोख्याने वास्तव्य करीत आहे. त्यांच्यामध्ये धार्मिक सलोखा वृद्धिंगत व्हावा या हेतूने ओंकार जाधव मित्र परिवाराने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यात दोनशे मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मा.उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अमर धुमाळ, मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद, पत्रकार तैनूर शेख, सदर कुरेशी समाजाचे हाजी समद कुरेशी, सुभान कुरेशी, वसीम कुरेशी, फिरोज कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते सयाजी गायकवाड, विजय जाधव, अरविंद जाधव, दिलीप गायकवाड, जंबु गायकवाड, राहुल गायकवाड, दीपक जाधव, निलेश गायकवाड, संजय गायकवाड, ईजाज खान ,सलीम शेख, फारूक खान उपस्थित होते. इफ्तार पार्टीच्या यशस्वी आयोजनासाठी ओंकार जाधव मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुरेंद्र गायकवाड यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )