देऊळगाव रसाळ विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद रसाळ यांची निवड

प्रतिनिधी : दिपक वाबळे. देऊळगाव रसाळ , बारामती, मंगळवार दिनांक 07 डिसेंम्बर 2021

देऊळगाव रसाळ विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सौ. रोहिणी पंढरीनाथ रसाळ यांनी राजिनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी आज सोसायटीच्या कार्यालयामध्ये सचिव मा. शंकर रसाळ यांच्या उपस्थितीत निवडीची प्रक्रिया पार पडली त्यावेळी श्री. प्रल्हाद एकनाथ रसाळ यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची देऊळगाव रसाळ विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यावेळी उपस्थित बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा. अंकुश रसाळ , बारामती दूध संघाचे संचालक मा. सुरेश रसाळ , सोसायटीचे माजी चेअरमन मा. लालासाहेब रसाळ, राजेंद्र खंडागळे , मानसिंग रसाळ , आनंद रसाळ , हनुमंत रसाळ , सोमनाथ चव्हाण , विकास पेटकर , नाना लोंढे , दिलीप रसाळ , शुभम रसाळ , राजेंद्र रसाळ , तुकाराम रसाळ , सागर रसाळ , संजय रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )