दुग्धत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण संपन्न

दुग्धत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण संपन्न
बारामती दि.१७- मौजे वाघवस्ती सांगवी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत दुग्धत्पादन करणाऱ्या पशु प्रजननातील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, एबीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे तज्ज्ञ प्रशिक्षक निलेश लगड तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सचिव पोपट तावरे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, उपस्थित होते.

श्री. लगड यांनी दुग्धोत्पादन वाढीसाठी जनावरांच्या खाद्याचे नियोजन, प्रजननाबाबत गोपालकांकडून होणाऱ्या त्रुटी, जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करताना घ्यावयाची काळजी व संकरित वळूंचे पैदाशीमध्ये असलेले महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )