तुषार क्षिरसागर यांची इंदापूर तालुका भाजपा ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती …

तुषार क्षिरसागर यांची इंदापूर तालुका भाजपा ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती …

(भिगवण, प्रतिनिधी ) – भिगवण येथील मा.ग्रामपंचायत सदस्य प्रा. तुषार क्षीरसागर यांची भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर तालुका ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
पक्षाच्या वतीने दि.30 एप्रिल रोजी तालुका स्तरावरील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांची निवड महत्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी बोलताना तुषार क्षिरसागर यांनी सांगितले की,
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचा तसेच,सर्वसामान्य लोकांना या पदाच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

तुषार क्षिरसागर यांचा जनसंपर्क चांगला असून त्यांच्या पत्नी दीपिका क्षीरसागर या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या असून सरपंच पदाच्या प्रबळ दावेदार देखील आहेत.
यावेळी संजय रायसोनी यांची भारतीय जनता पक्षाच्या (फादर बॉडी) इंदापूर तालुका सरचिटणीस पदी तर रणजित जाधव यांची इंदापूर तालुका युवा मोर्चाच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )