तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.भगवान माळी यांना एपीएसआय साईंटिस्ट ऍवार्ड २०२३ व मगनभाई लाईफटाइम अचिव्हमेंट ऍवॉर्ड २०२३ या दोन पुरस्काराने गौरविण्यात आले.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.भगवान माळी यांना एपीएसआय साईंटिस्ट ऍवार्ड २०२३ व मगनभाई लाईफटाइम अचिव्हमेंट ऍवॉर्ड २०२३ या दोन पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रा.डॉ.भगवान माळी यांना ऍकेडेमी ऑफ प्लॅंट सायन्सेस, मुझफ्फरनगर उत्तरप्रदेश व श्रीमती एन.एम.पडालिया फार्मसी कॉलेज, अहमदाबाद यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ वी एपीएसआय शास्त्रज्ञ बैठक व ड्रग्ज डिस्कव्हरी ऍण्ड डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रो बायोटेक्नॉलॉजी या विषयावरील २३ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये जेतुर, गुजरात येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये डॉ.माळी यांना वनस्पतीशास्त्रामध्ये केलेले संशोधन योगदान त्याचबरोबर भारत सरकारचे त्यांना मिळालेले पेटंट यासाठी डीआरडीओ चे शास्त्रज्ञ डॉ.राजकुमार यांचे हस्ते एपीएसआय डिस्टिंग्विशड साईंटिस्ट ऍवार्ड २०२३ व मगनभाई पटेल लाईफटाइम अचिव्हमेंट ऍवॉर्ड २०२३ या दोन पुरस्कार व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.
त्याचबरोबर डॉ. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.विनायक भगत, श्री.दत्तात्रय शिंदे आणि विक्रम पाटील यांनी सुद्धा या परिषदेमध्ये सादर केलेल्या संशोधनाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
डॉ.भगवान माळी यांच्या यशाबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )