टेक्निकल विद्यालयात महिला शिक्षिकांचा सन्मान

टेक्निकल विद्यालयात महिला शिक्षिकांचा सन्मान

प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यासाठी ज्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना मोलाची साथ दिली अश्या सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या वेळी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.जागतिक स्तरावर महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विद्यालयात सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्रा.श्री झाकीर शेख, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री रमेश जाधव, जेष्ठ शिक्षक श्री प्रदीप पळसे व इतर शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )