गौण खनिजाची वाहतूक करताना ताडपत्रीचे आच्छादन करण्याचे आवाहन

गौण खनिजाची वाहतूक करताना ताडपत्रीचे आच्छादन करण्याचे आवाहन

पुणे दि.3: वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाची वाहतूक करू नये आणि गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर ताडपत्रीचे आच्छादन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.

वाळू, माती, मुरुम, खडी आदी गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर आच्छादन नसल्यास वाळू खडी सांडत असते. त्यावरून इतर वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच वाहनातून उडणारे धुलीकण मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांमध्ये जात असल्याने अपघात होतात.

मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 133 नुसार भार क्षमतेपेक्षा अधिक माल असलेले वाहन चालविणे, ते चालविण्यास प्रवृत्त करणे किंवा ते चालविणे हा गुन्हा आहे. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात येणार असून रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने वाहनचालकांनी सूचनांचे पालन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )