गोजुबावी सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप आटोळे यांची बिनविरोध निवड

गोजुबावी सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप आटोळे यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील गोजुबावी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री दिलीप आटोळे यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वीचे चेअरमन श्री सोनल आटोळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.यासंबंधी बारामती प्रशासकीय भवन मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अर्ज मागवले होते, त्यामध्ये दिलीप आटोळे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पांडुरंग जाधव, विकास आटोळे, मोहन आटोळे, सोनल आटोळे, भानुदास आटोळे,राजेंद्र खराडे, तानाजी आटोळे यांनी प्रयत्न केले. दिलीप आटोळे हे गोजुबावी च्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या निवडीबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )