गोजुबावी मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

गोजुबावी मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती, गोजुबावी या ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन जाधव, वि का स सेवा सोयायटीचे संचालक पांडुरंग जाधव व ग्रामपंचायत सदस्य किशोर जाधव यांनी केले. शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले गेले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत गोजुबावी चे सरपंच माधुरी कदम, सदस्य हिराबाई जाधव, माजी सरपंच अश्विनीताई आटोळे, सदस्य मनीषा जाधव, गोजुबावी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रमेश गिरमे, व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विश्वगंगा शिंदे उपस्थित होत्या. महिलांना आरोग्य, सकस आहार व मुलांचे संगोपन या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. गावातील पहिली महिला डॉ ऋतुजा जाधव व क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन केलेली ऑलम्पिक साक्षी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली जाधव यांनी केले, प्रास्ताविक अनिता लोंढे यांनी केले. या कार्यक्रमानिमित्त महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )