कुसेगाव येथे कृषी संजीवनी मोहीम सप्ताहास सुरुवात

कुसेगाव येथे कृषी संजीवनी मोहीम सप्ताहास सुरुवात

प्रतिनिधी – आज दिनांक २५/६/२०२२ रोजी मौजे कुसेगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहीम सप्ताहास सुरुवात करण्यात आली. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच पीक सल्लाविषयक माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी राज्यभर हा कार्यक्रम राबविला जात आहे. सप्ताहातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयांवर तंत्रज्ञानाचा जागर करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जात आहे. सदर कार्यक्रमास कृषी सहाय्यक मोनिका दिवेकर यांनी प्रास्ताविक करून मोहिमे विषयी माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक पोपट चिपाडे यांनी विविध पिकांचा तंत्रज्ञान प्रसार, बिज प्रकिया, वाण निवड बीबीएफ, कीड व रोग नियंत्रण याविषयी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच अमोल शितोळे, मोहन शितोळे, विजय शितोळे, सागर शितोळे, गणेश शितोळे इ शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )