कीप ऑन रोलिन स्केटिंग क्लबची मुलं ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये…

कीप ऑन रोलिन स्केटिंग क्लबची मुलं ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये…

प्रतिनिधी – कीप ओन रोलिंग स्केटिंग क्लब मधील तीन Skaters १.शिवतेज दातीर २.सुगंध कुमावत आणि ३.वेदांत आटोळे यांनी कोच तनिष्क सचिन शहा यांच्यासहित आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले आहे.२७ मे ते ३१ मे रोजी बेळगाव मधील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबने आयोजित केलेले Most people completing 100m on skates in the least amount of time (48 hours) या tital मद्ये हे रेकॉर्ड 300 मुलांनी पूर्ण केले . त्यामध्ये आपली बारामतीतील शिवतेज , सुगंध आणि वेदांत यांनी मेहनत घेऊन दिलेला टास्क पूर्ण केला व आपले नाव या रेकॉर्डसाठी नोंदवले. हे रेकॉर्ड म्हणजे 48 तासांचा रिले होता. ऊन , वारा , पाऊस या असेल त्या परिस्थितीत तसेच दिवस रात्र न पाहता पूर्ण 48 तास हे रेकॉर्ड चालू असते. असे रेकॉर्ड करण्यासाठी मुलांचा स्टॅमिना तर लागतोच पण त्याबरोबर मेहनत करण्याची तयारी लागते तसेच या रेकॉर्डसाठी उतरण्यापूर्वी मुलांचे पूर्णतः मेडिकल चेकअप तिथेच केले जाते व त्यातून पास झाले तरच रेकॉर्डला उतरू शकतात. त्यांना कोच तनिष्क शहा यांचे मार्गदर्शन तर लाभलेच तसेच पालकांचाही खूप मोठा सपोर्ट मिळाला. महत्त्वाचे म्हणजे ९/१०/१३ वर्षाची ही मुले पालकांशिवाय पाच दिवस कोच बरोबर बेळगावला राहिली आणि रेकॉर्ड पूर्ण करूनच बारामतीचे नाव आणखीन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या मुलांमुळे आणि कोच मुळे आता बाकीच्या मुलांनाही असे नवनवीन रेकॉर्ड करण्यासाठी एक नवीन प्रेरणा मिळाली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )