एकता इंग्लिश मिडियम स्कूलचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

एकता इंग्लिश मिडियम स्कूलचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

बारामती: शिक्षण महर्षि डाॅ.पी.ए.इनामदार एकता इंग्लिश मिडियम स्कूलचे उदघाटन डाॅ.पी.ए इनामदार यांच्या अध्यक्षते खाली तर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात इनामदार यांनी शिक्षण क्षेत्रात एकता इंग्लिश मिडीयम स्कूल ज्या प्रमाणे शिक्षण देत आहे यांचे कौतुक करीत मी केलीली मदत ही माझी नसुन अल्लाह ने दिले म्हणुन मी दिले येथील प्रत्येकाने काही तरी देण्याची वृत्ती ठेवली पाहीजे त्यापेक्षा दुप्पटीने तुम्हाला फळ मिळते तसेच अत्ताचा काळ हा आधुनिक असुन विद्यार्थीना लिहता नाही आले तरी चालेल पण इंग्लिश उत्तम बोलता येणे गरजेचे आहे.कारण आज मोबाईल मध्ये बोललो की ते टाईप होत असे म्हणजे आपले लिहण्याचे काम ही कमी झाले आहे.असे सांगत, पुढे म्हणले की १९५० मध्ये मुली १ टक्का शिक्षण घेत होते आज ७७ टक्के मुली शिक्षणात असुन हे सर्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटने मुळे झाले आहे.हे विसरता कामा नये तर अजितदादा यांच नेतृत्व एवढ मोठ आहे की आज आपण नकारात्मक विचार करायच नाही ही शपथ घेतली पाहिजे मी हे करणारच अस ठरवल पाहीजे असे डाॅ.पी.ए.इनामदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एकता इंग्लिश मिडियम स्कूल पाहणी करुन आपल्या भाषणात बांधकामाचे कौतुक करुन शाळेच्या शिक्षकांना विद्यार्थी बरोबर इंग्लिश मध्येच संभाषण केले पाहिजे व शिक्षण संस्थाचा उल्लेख करत आपल्या शाळेचा शिक्षणचा उत्तम दर्जा टिकला पाहिजे व आपल्या शाळेतील विद्यार्थ्यानी चांगल शिक्षण घेऊन राज्य व देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आपल्या परीने दिले पाहिजे तर बारामतीचा विकास करित असताना अनेक कामी हाती घेतली असुन माझ्या सकट तमाम बारामतीकरांनी नियम पाळले पाहीजे असे बोलत एकता इंग्लिश मिडियम स्कूल प्रगती करत जावो असे शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमा वेळी विशेष उपस्थिति राजेंद्र पवार चेअरमन बारामती अॅग्रो, प्रदिप गारटकर अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, पोर्णिमा तावरे मा.नगराध्यक्ष बानप, सचिन सातव चेअरमन बारामती सहकारी बँक, संभाजी होळकर अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ,किरण गुजर ज्येष्ठ नगरसेवक बानप तर प्रमुख उपस्थित शेख सुभानअली सर,हाजी सोहेल खान,अॅड.शिरीष कुलकर्णी, अलीरजा इनामदार,सत्यव्रत काळे,तरन्नुम सय्यद,राजेंद्र सोळसकर,बाळासाहेब चव्हान,धनंजय जामदार,फरजाना शेख,दिलीप ढवाण,सिमा चिचंकर,संतोष जगताप,उपस्थित होते सदर कार्यक्रमाची प्रस्तावना मध्ये परवेज सय्यद व अलताफ सय्यद यांनी केले तर सुत्रसंचालन कमरुद्दीन सय्यद यांनी तर आभार मुख्याध्यापिका सुमैय्या मुलाणी यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )