प्रतिनिधी - बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या विद्यालयात आज मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊर्मिला भोसले यांनी केले.त्यांनी आपल्या मनोगतामधून मराठी दिनाचे महत्व अधोरेखित करत श्री वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचे मराठी विषयात असलेले योगदान स्पष्ट केले.इ 9 वी च्या विद्यार्थांनी आपली मनोगते व्यक्त केली . यावेळी कनक चवरे,प्रतीक्षा बेलदार,आर्या माने,सार्थक बनकर या विद्यार्थांनी मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करत कुसुमाग्रज यांच्या काही कवितांचे वाचन केले.मराठी दिनानिमित्त विद्यालयात काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यालयाचे प्रा.श्री पोपट मोरे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री निवास सणस ,आजीव सदस्य अर्जुन मलगुंडेविद्यालयातील सर्व मराठी विषय शिक्षक व इतर सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed