बारामती, दि. 31: बारामती तहसिल कार्यालय पुरवठा शाखेची शहर दक्षता समितीची बैठक शहर दक्षता समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात पार पडली.
फ्री सेल रॉकेलची नियमावली जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून घेण्यात यावी आणि फ्री सेल रॉकेलचा साठा स्वस्त धान्य दुकानात केल्याने दुकानातील धान्य खराब होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना श्री. गायकवाड यांनी यावेळी दिल्या. बैठकीस पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, प्रभारी तहसिलदार विकास करे, शहर दक्षता समितीचे सदस्य रेहाना शिकीलकर, रेश्मा ढोबळे, सुशांत सोनवणे, वस्ताद माने, वीरधवल गाडे, शौकत बागवान, बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. बैठकीत बारामती तालुक्यातील प्राप्त शासनाचे धान्य उचल, वाटप याबाबत चर्चा झाली. तसेच तहसिल कार्यालयात नवीन दुबार शिधापत्रिकेबाबत जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्या शिधापत्रिकांबाबतचे अर्ज तात्काळ निर्गत करण्याबाबतच्या अध्यक्षांनी सूचना दिल्या. ग्रामीण दक्षता समितीची बैठकही संपन्न
ग्रामीण दक्षता समितीची बैठकही ग्रामीण दक्षता समितीचे अध्यक्ष पोपट पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळीही शासनाचे धान्य उचल, वाटप याबाबत चर्चा झाली. बैठकीस प्रभारी तहसिलदार विलास करे, सदस्य अनिल बागल, सुनील खोमणे, सुनील काटकर, शिवाजी काकडे आदी उपस्थित होते.