प्रतिनिधी- पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अभिनव देशमुख यांनी वालचंदनगर मर्डर केस मधील आरोपीस शोधून त्यास तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार आरोपी अमित नरुटे हा ठाणे रेल्वे स्टेशन येथे आल्याची माहिती मा गणेश इंगळे सो एसडी पीओ बारामती यांना मिळाली, त्या अनुषंगाने तपास करीत असताना नमूद आरोपी हा रेल्वे ने पुणे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्या वरून त्यास खडकी रेल्वे स्टेशन येथे सापळा लावून पकडले व त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अमित पांडुरंग नरुटे वय 31 वर्षे,रा काझड, ता इंदापूर जि पुणे असे सांगितले, त्यास सदर गुह्याच्या कामी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे… नमूद आरोपीने त्याचे आईचा शेतीचे वाटप व इतर घरगुती कारणावरून मर्डर केला असून वडिलांचा जीव घेण्याचे उद्देशाने गंभीर दुखापत केली आहे. या बाबत वालचंदनगर पो स्टे येथे दि 02 जानेवारी 2022 रोजी गुन्हा रजी नं 02/2022 भाद वि कलम 302,307,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, सदरची कारवाई. मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख सो.मा. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सपोनि संदिप येळे, सपोफौ दत्तात्रय जगताप, पो.हवा महेश बनकर, पो.हवा हेमंत विरोळे, पो.ना बाळासाहेब खडके, पो.हवा रविराज कोकरे, पो.ना अमोल शेडगे, पो.हवा सचिन घाडगे, पो ना अभिजीत एकशिंगे, पो ना स्वप्निल अहिवळे, चा सहा फौ काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.