डोर्लेवाडी : झारगडवाडी ( बारामती ) येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी गोरख रामहरी बोरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 15 फेब्रुवारी या दिवशी झालेल्या ऑफलाइन ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी गोरख बोरकर, गणेश बोरकर, बाळासाहेब कोळेकर, महादेव कुलाळ, रामभाऊ कुलाळ, राजेंद्र टिंगरे, महेश मासाळ हे सात जण सातजण इच्छुक होते. यात गावातील प्रमुख नारायण कोळेकर, अजित बुरुंगले, नितीन शेडगे, रणजित बोरकर, पोपट कुलाळ, रमेश बोरकर, प्रशांत बोरकर, मच्छिंद्र टिंगरे, प्रवीण बोरकर, अंकुश निकम, अजित बोरकर यांच्या पुढाकाराने अखेर एक वर्षांपासून रिक्त असलेले तंटामुक्ती अध्यक्ष पद हे बिनविरोध करण्यात यश आले आहे. यामध्ये सहा जणांनी माघार घेतल्याने गोरख रामहरी बोरकर यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी भिवाजी काळे यांनी घोषित केले.
यावेळी सरपंच वैशाली मासाळ, उपसरपंच सोनाली चव्हाण, माझी उपसरपंच वैष्णव बळी, सदस्य पूनम आवटे, अनिता जाधव, सोनाली करे, पदमनाथ निकम, हनुमंत झारगड, दत्तात्रय जळक, सतीश कुलाळ, अमोल बोरकर, वरद बोरकर, विठ्ठल करे, मच्छिंद्र करे, शांताराम बोरकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.