प्रतिनिधी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुकाध्यक्ष मा.हिम्मत नागणे यांचा वाढदिवस फुलझाडे लावून जल्लोषात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटीलवस्ती (बोरगाव) ही या शाळेच्या आवारात मंगळवार दि.१५ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम पार पडला.
मागील वर्षी अध्यक्षांचा वाढदिवस एड्सबाधित लहान मुलांच्या शाळेत पालवी प्रतिष्ठान पंढरपुर या संस्थेत करण्यात आला होता, त्याचप्रमाणे यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटीलवस्ती बोरगाव या शाळेस फुलझाडे भेट देऊन वृक्षारोपण करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठनेते मा.रघुनाथ (बप्पा) पाटील यांनी स्वीकारले, तसेच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष हिम्मत नागणे यांचा वाढदिवस कर्तव्यदक्ष शिक्षक मा. किरण डोंगरे यांनी फेटा व गुलाब पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी उपाध्यक्ष शिवराम गायकवाड, बिभीषण पाटील, सोमनाथ इंगोले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.सत्यवान(काका) पाटील, अक्षय निकम, डॉ.नागन्नाथ दगडे, सौरभ नागणे, सुरज गुळुमकर, सिताराम शिंदे, निखील कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.किरण डोंगरे सर यांनी केले व व शाळेतील प्रगतीचा वाढत्या आलेखाची माहिती कुदळे मॅडम यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी वृक्षारोपण यांचे महत्त्व पटवून देवून मनोगत व्यक्त करून आपल्या घराजवळ प्रत्येकाने वाढदिवसाच्या निमित्ताने किमान एक तरी झाड लावा असे आवाहन शिवराम गायकवाड यांनी केले तसेच यावेळी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार बिभीषण पाटील यांनी मानले.